Friday, June 9, 2023

Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने

पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय’ अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता.
संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. मराठा आंदोलकांनी कालपासून लोकप्रतिनिधींच्या घरा समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काल लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती.