आता मोबाईल अॅपवरून करा रंगकर्मींना मदत! ; अभिनेता श्रेयस तळपदेचा नवा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंधासहित लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परिणामी यांमुळे चित्रपटगृह, नाटय़गृह ते अगदी राज्यात सुरु असलेले चित्रीकरण देखील बंद आहेत. त्यामुळे संबंधित कलाकार आणि रंगमंच कामगार यांच्या मदतीसाठी अभिनेता श्रेयस तळपदे याने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. ‘ नाईन रस’ हा ओटीटी अॅप डाऊनलोड करा आणि मदत करा , असे आवाहन त्याने माध्यमांशी बोलताना केले आहे .

https://twitter.com/shreyastalpade1/status/1380362944320446466

गतवर्षी लॉकडाऊनमध्ये श्रेयसने त्याचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘नाईन रस’च्या माध्यमातून जोरदार पदार्पण केले होते. हा ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे. यावर नाटक, लाइव्ह परफॉर्मन्सेस, कथाकथन तसेच स्टँडअप शोदेखील बघता येतात. श्रेयसने या कोरोनाच्या काळात रंगमंचावरील आणि मागील कलाकारांना काहीतरी हातभार मिळावा यासाठी हा उपक्रम सुरू केला होता. पण यावर्षी पुन्हा एकदा कोरोना विषाणूने जोर धरला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा रंगमंच कलाकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

https://www.instagram.com/p/CO-u4IkJkh6/?utm_source=ig_web_copy_link

‘नाईन रस’ या अॅपवर क्लब तसेच ग्रुप एकत्र येऊन स्क्रीन प्ले करू शकतात. तर यासाठी सब्स्क्रिप्शन करावे लागणार आहे. यामुळे प्रत्येकाला घरी बसूनच नाटकांचा आनंद घेता येईल. यातून मिळणारी मोठी रक्कम ही कलाकार तसेच अन्य रंगकर्मींना जाणार आहे. तर उरलेली रक्कम ही अन्य गरजू रंगमंच कलाकार आणि कामगारांना दिली जाणार आहे. याविषयी बोलताना श्रेयस म्हणाला कि, ”आम्ही ‘नाईन रस’ ही संकल्पना मागील वर्षी स्टेज आर्टिस्टना मदत करण्याच्या हेतूने आणली होती. पण या वर्षी पुन्हा एकदा हे सगळे कलाकार त्याच समस्येला सामोरे जात आहेत. त्यामुळे ‘नाईन रस’च्या टीमने पुन्हा एकत्र येत कलाकारांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment