बुलेट क्वीन..! अंजलीबाईंच्या हटके अंदाजावर राणा दा झाला फिदा; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेली मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला. या मालिकेतील अंजली बाई आणि राणा दा हि जोडी प्रेक्षकांनी इतकी भावली कि मालिका संपली तरीही प्रेक्षकांच्या आठवणीत हि दोन्ही पात्र जिवंत आहेत. या मालिकेतील अंजली पाठक अर्थात अंजलीबाई हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी यांनी प्रत्येक घरात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. यामुळे आजही हे दोघे प्रेक्षकांचे लाडके आहेत. नुकताच अक्षयाचा एक व्हिडीओ आणि त्यावरील हार्दिकची कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

चाहत्यांच्या संपर्कात राहता यावे यासाठी अक्षया आणि हार्दिक दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. याच दरम्यान ते आपले फोटो आणि विधिव चाहत्यांसह शेअर करत असतात. नुकताच अक्षयाने बुलेटवर स्वर होऊन चालवतानाचा एक व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते तर थक्क झालेच मात्र राणा दा तर सुद्धा चक्रावला आहे. हार्दिकने अक्षयच्या या व्हिडिओवर कमेंट करताना तिला ‘बुलेट क्वीन’ म्हणून संबोधले आहे. यामुळे अक्षयच्या व्हिडीओसह त्याच्या या कमेंटची सुद्धा चांगलीच चर्चा आहे.

 

हार्दिकपेक्षा जास्त अक्षया इंस्टाग्रामवर सक्रिय दिसते. ती नेहमीच वेगवेगळे लूक आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. या फोटोंप्रमाणे ती अनेक मजेशीर व्हिडीओही शेअर करत असते. त्यातील हा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओत ती इतकी बिनधास्त बुलेट चालवताना दिसत आहे, कि तिचा हाच अंदाज कुणालाही भावणारा आहे. एकंदर काय तर सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या चाहत्यांच्या काळजाला पुन्हा एकदा हात घातला आहे.

You might also like