Saturday, March 25, 2023

आरारा खतरनाक! अमृता खानविलकरच्या योगा पोज पाहून चाहते झाले थक्क; पहा फोटो

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बऱ्याचदा होत आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चांगलीच चर्चेत असते. आजकाल ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. दररोज नवनवीन अपडेट आणि फोटो किंवा व्हिडिओंसह ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात येत असते. मात्र यावेळी अमृताने खर्च केलाय. तिने सोशल मीडियावर सगळ्यांनाच चकीत केले आहे. नेहमी ग्लॅमरस फोटो टाकणाऱ्या अमृताने यावेळी अश्या अश्या योगा पोजमधील फोटो शेअर केले आहेत कि ते पाहून चाहत्यांनाही बोट तोंडात घातली असतील. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

अमृताने नुकतेच इंस्टाग्रामवर योगा पोजमधील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. सोबत तिने लिहिले, ‘नवीन सीरिज, लवकरच येणार’. या पोस्टमधून लक्षात येत आहे की, अमृता योगा पोझमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरीत करीत आहे. अमृता हे योगाभ्यासाचे धडे रसिका क्षिरसागरकडून गिरविते आहे.

तिने योगा पोझमधील फोटो शेअर करत म्हटले की, तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही मजबूत असता. असे माझ्या शिक्षिका सांगतात. रसिका क्षिरसागर मी तुझी आभारी आहे माझ्यासोबत असण्यासाठी आणि मला प्रशिक्षण देण्यासाठी. दुसऱ्या योगा पोझमधील फोटो शेअर करून अमृताने लिहिले की, सर्व काही शक्य आहे, यावर विश्वास ठेवा.

आणखी एक फोटो शेअर करत तिने म्हटले की, सोपे काहीच नसते, मजबूत बना. अमृता खानविलकरच्या या फोटो आणि कॅप्शनमधून लक्षात येते की, ती फिटनेसबाबत अतिशय काळजी घेऊ लागली आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची भरभरून पसंती मिळत आहे. अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ‘वेल डन बेबी’ या ओटीटीवरील मराठी चित्रपटात दिसली होती.

त्याआधी ती मराठी चित्रपट चोरीचा मामलामध्येही झळकली होती. यात तिच्यासोबत जितेंद्र जोशी, क्षिती जोग, हेमंत ढोमे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर आगामी चित्रपट पाँडिचेरीमध्ये ती दिसणार आहे. या सिनेमात अमृता सोबत सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि नीना कुलकर्णी दिसणार आहेत.