चंदेरी दुनिया । आपल्या रोखठोक भूमिकांसाठी परिचीत असलेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात जाळपोळ आणि हिंसा सुरु असताना, मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून देशवासियांना शांततेचं आवाहन केलं आहे.
मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आधी तुमच्या आयटी सेलवाल्यांना आवरा, असा थेट सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला. इतकंच नाही तर भाजपची आयटी सेल हीच खरी तुकडे-तुकडे गँग आहे, असा घणाघातही रेणुका शहाणे यांनी केला.
नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील राड्यानंतर, देशभरात जाळपोळ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काल 16 डिसेंबरला दुपारी दोन वाजता ट्विट करुन, शांततेचं आवाहन केलं. मोदींच्या या ट्विटला कोट करत, रेणुका शहाणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.