बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल..! अभिनेत्री किशोरी शहाणेंचा नऊवारीतला भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाळ अनेक जण आपल्या कला सादर करण्यासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसतात. यात मुळातच असलेले कलाकार देखील आपल्या चाहत्यांची वाह वाह मिळवण्यासाठी सोशल मीडियावर कधी वेगवेगळ्या लूकमधील फोटो तर कधी भन्नाट व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात.अभिनेत्री किशोरी शहाणे देखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यादेखील आपले फोटो, व्हिडिओ आणि अगदी व्हॅकेशन बद्दल सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांचा नऊवारी साडीतला एक भन्नाट डान्स व्हिडीओ वायरल झाला आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी इंस्टाग्राम सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर अतिशय वायरल झाला आहे. इतकेच नव्हे तर या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चादेखील रंगली आहे. यात नऊवारी साडी परिधान केलेल्या किशोरी शहाणे माधुरीच्या ‘बडी मुश्कील बाबा बडी मुश्किल’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा हटके अंदाज आणि बिटपूर्वक डान्स त्यांच्या चाहत्यांना प्रचंड भावला आहे. किशोरी अफलातून नृत्यांगना आहेत यात काही वादच नाही. त्या नेहमीच आपल्या सुंदर अभिनयासोबत तालबद्ध नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध राहिल्या आहेत.

किशोरी शहाणे या लहानपणापासून नृत्य आणि अभिनय याबाबत विशेष रुची ठेवून होत्या. शाळेत असताना ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेत त्यांनी काम केले होते. त्‍यानंतर राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. या दरम्यान त्यांनी वामन केंद्रे दिग्दर्शित ‘शतुरमुर्ग’ या हिंदी नाटकातदेखील काम केले.

असे करता करता मग ‘मोरूची मावशी’ या सुप्रसिद्ध व्‍यावसायिक नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरावर चांगलेच कौतुक झाले. त्यानंतर ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. पुढे त्यानी एकापेक्षा एक हटके आणि सुपरहिट चित्रपट दिले. किशोरी शहाणे यांनी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या त्या गुम है किसी के प्यार में या हिंदी मालिकेत दिसत आहेत.

You might also like