Monday, January 30, 2023

‘ये रात और ये दूरी…’ अभिनेत्री मानसी नाईकला येतेय नवऱ्याची आठवण; स्पेशल व्हिडीओ केला इंस्टावर शेअर

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघतोय रिक्षावाला या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारी मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. नेहमीच ती सोशल मीडियावर स्वतःचे आणि आजकाल आपल्या नवऱ्यासोबतचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच बॉक्सर प्रदीप खरेरासाठी बनवला आहे. नवरा लांब असल्यावर तिची होणारी अवस्था तीने आपल्या चाहत्यांसह एका मजेशीर व्हिडिओतून शेअर केली आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना अत्यंत आवडतो आहे.

https://www.instagram.com/p/CPnaTIcAfih/?utm_source=ig_web_copy_link

- Advertisement -

अभिनेत्री मानसी नाईक हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, माझा नवरा लांब गेल्यावर माझी अशी होईल अवस्था. हा व्हिडीओ मी माझ्या नवऱ्यासाठी बनवला आहे. या व्हिडीओत मानसी नाईक नाइट सूटमध्ये बॉलिवूड जगतातील लोकप्रिय कॉमेडी चित्रपट ‘अंदाज अपना अपना’मधील ये रात और ये दूरी या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. इतकेच नव्हे तर तिच्या या व्हिडीओवर तिचा नवरा प्रदीप खरेरा याने देखील कमेंट केली आहे. त्याने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, मला हा व्हिडीओ खूप आवडला. पाहून मजा आली.

https://www.instagram.com/p/CPBiuieAVsQ/?utm_source=ig_web_copy_link

मानसी सध्यातरी चित्रपटात काम करताना दिसत नाहीये. मात्र सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून ती चर्चेत येत असते. मानसी तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा याच्यासोबत गेल्या जानेवारीत लग्नबेडीत अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. लग्नानंतर हे जोडपे वाटेवरी मोगरा या म्युझिक अल्बममध्येही झळकले होते.

https://www.instagram.com/p/CLdY0Rqg5EQ/?utm_source=ig_web_copy_link

मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो एक अभिनेता आणि मॉडेलदेखील आहे. मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली होती. तसेच तिने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.