फक्त राजीनामा नको,चौकशी करून सत्य समोर येऊ द्या ;संजय राठोड राजीनामा प्रकरणावर मराठी स्टार आरोह वेलणकर याची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट वनमंत्री संजय राठोड यांच्या पर्यंत जात होते.सत्ताधारी सेनेला विरोधी पक्षातील नेते दररोज धारेवर धरत होते. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संजय राठोड यांचा राजीनामा घेतला.

आता या प्रकरणात सेलिब्रिटी सुद्धा आपली मत व्यक्त करतांना दिसतं आहेत. बिग बॉस फेम मराठी स्टार आरोह वेलणकर याने ट्विट करत असं म्हटलं आहे की “चांगलच झालं, अटक झाली ती पण फक्त राजीनामा नको, अटक,चौकशी करून सत्य महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे!! आता खऱ्या शक्तीप्प्रदर्शनाची गरज आहे!!

या आधीही आरोह वेलणकर याने बऱ्याच घटनांवर आपली परखड मतं व्यक्त केली आहेत.

कोण आहे आरोह वेलणकर

प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याचं अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली होती.त्याच बरोबर तो नाटकात देखील काम करत असतो.काही दिवसांपूर्वीच त्याने “व्हाय सो गंभीर” या नाटकात महत्वाची भूमिका साकारली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like