हॅपी बर्थडे स्नेहल शिदम! कला असली की जगही जिंकता येत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येऊ द्या – होऊ दे व्हायरल’ पर्वाची विजेती आणि मराठी अभिनेत्री स्नेहल शिदमचा आज २५वा वाढदिवस आहे. चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून स्नेहलने अनेको प्रेक्षकांना अगदी खळखळून हसविले. कधीकाळी थिएटर करणारी स्नेहल आज मोठ्या पडद्यावरही झळकली आणि आता झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतही दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना अत्यंत आवडत आहे. याआधी स्नेहल स्विटी सातारकर या मराठी चित्रपटातही झळकली होती. स्नेहलच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते आणि अनेको नेटकरी तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

दिसायला अगदी साधी सुधी आणि इतर मुलींसारखी दिसणारी स्नेहल कधी सेलिब्रिटी झाली तेच कळलं नाही. मुळात लहानपणापासून स्नेहालाला अभिनय आणि नृत्य या दोन्ही कलांची विशेष आवड होती. शिवाय मोठी झाली तेव्हा आवड आणि निवड दोन्हीही एक असल्यामुळे आज अभिनय क्षेत्रास स्नेहालसारखी बहुरूपी व गुणी नायिका मिळाली आहे.

स्नेहलचा जन्म मुंबईतच १९ जून १९९६ साली झाला. तिचे शालेय शिक्षण विलेपार्ले महिला संघ श्री माधवराव भागवत हायस्कुल येथे झाले. पुढील शिक्षण कीर्ती कॉलेज,दादर येथून तिने पूर्ण केले. दरम्यान महाविद्यालयात असताना स्नेहलने अनेक एकांकिकांमध्ये काम केले आणि उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिकही पटकावले.

त्यानंतर तिने ‘चला हवा येऊ द्या – होऊ दे वायरल या पर्वत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून विजेतेपद मिळवले. त्यानंतर ती चला हवा येउ द्या – सेलिब्रिटी पॅटर्न’मध्येदेखील कम्माल करताना दिसली होती.

दिग्दर्शक शब्बीर नाईक यांचा ‘स्वीटी सातारकर’ हा स्नेहलच्या अभिनय करिअरमधला पहिला चित्रपट होता. यात तिने अमृता देशमुख व संग्राम समेळ या कलाकारांसह स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर ती आता झी मराठी वरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ मध्ये विद्या नामक भूमिका साकारत आहे.

तिची हि भूमिका भले सहाय्यक असेल, मात्र तिने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. इतकेच नव्हे तर तिच्या अभिनयाचे अत्यंत कौतुक देखील केले जात आहे. ते म्हणतात ना, अंगी कला असेल तर जगही जिंकता येत. फक्त जिद्दीने आणि मेहनतीने कष्ट करायची तयारी हवी. तीच तयारी स्नेहलने दाखवली आणि हि बर्थडे गर्ल आज अनेको प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. अश्या या मेहनती आणि गुणी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

You might also like