Tuesday, January 31, 2023

हैप्पी बर्थडे अशोक मामा..! कॉमिक टायमिंगमध्ये तुम्ही अगदी जिनियस आहात; निवेदिता सराफ यांची खास पोस्ट

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अशोक सराफ हे नाव असं वेगळं काही विस्कटून सांगावं लागेल असं नाहीच मुळी. विनोदाच्या बादशाही कुणी ओळख करून देत का..? मराठी म्हणू नका किंवा हिंदी म्हणू नका.. दोन्ही सिने सृष्टीवर अशोक सराफ यांनी आपली जादू केली आहे. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या कॉमेडी अंदाजाने अख्खा महाराष्ट्र खळखळून हसवला आहे. असेच मजेशीर आणि बहुरंगी अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनेको चाहत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही एक पोस्ट करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

अभिनेत्री व अशोक सराफ यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशोक.. कॉमिक टायमिंग मध्ये तुम्ही अगदी जिनियस आहात. अशी हि बनवा बनवी, माझा पती करोडपती, धुमधडाका, शेजारी शेजारी मी अजूनही हे चित्रपट खूप एन्जॉय करते अगदी १०० वेळा पाहून झाले असले तरीही.. सुंदर फारच अप्रतिम.. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.. निरोगी रहा, सुरक्षित रहा.

अशोक मामांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. तसे ते मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे पूर्ण बालपण गेले. १९७१ साली ‘दोन्हीं घरचा पाहुणा’ हा त्यांचा पहिला चित्रपट. मात्र १९७५ रोजी दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ चित्रपटापासून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

https://www.instagram.com/p/CPsJ-C9qndk/?utm_source=ig_web_copy_link

त्यांचे शालेय शिक्षण डीजीटी विद्यालय येथून पूर्ण झाले आहे. १९९० साली अशोक सराफ यांचा विवाह निवेदितांशी झाला. या दोघांमध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. त्यांना अनिकेत नावाचा एक मुलगा आहे, जो व्यवसायाने शेफ आहे. १९६९ पासून अशोक सराफ चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात काम करत आहेत.

https://www.instagram.com/p/CPsGVfsBX0f/?utm_source=ig_web_copy_link

त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी किमान १०० तरी यशस्वी आहेत. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांचे मराठी नाटक, ‘ययाती आणि देवयानी’तून अभिनय कारकीर्दीत पाऊल ठेवले. पुढे १९६९ मध्ये ‘जानकी’ चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

https://www.instagram.com/p/CPsDMrsKeM3/?utm_source=ig_web_copy_link

‘पांडू हवालदार’ , ‘कळत नकळत’, ‘भस्म’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या. शिवाय लक्ष्यासोबतची त्यांची धमाल जोडी अनेक वर्ष इंडस्ट्रीवर राज्य करत होती. या जोडगोळीचा ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट अजूनही एव्हरग्रीन आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. मात्र ‘हम पांच’ या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेमुळे ते देशात घराघरात पोहोचले. अशोक सराफ यांनी पत्‍नी निवेदिता जोशी- सराफसोबत निर्मिती संस्थाही स्थापन केली होती. त्याद्वारे ‘टन टना टन’ व अन्य काही हिंदी मालिका त्यांनी बनवल्या.