राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे, एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ – केदार शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून राज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच मराठी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे राज ठाकरे यांना शुभेच्छा देताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा असून एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली.

राजसाहेब म्हणजे राजा माणूस आहे.. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे… संगीत चित्रपट या दोन क्षेत्रातला त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही.. मैत्री करावी तर या राजा माणसाशी.. सतत लक्ष असतं त्यांचं.. सतत संपर्कात असतात.. वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत… या कोरोनाच्या कठिण परीस्थिती मधे हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही.. हे आपल्याला सतत जाणवलय..मान्य करायालाच हवं…

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5649205631788130&id=100000962470497

एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही.. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली.. काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली… एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ.. नक्कीच आपल्यावर “राज्य” येणार नाही, याची ते काळजी घेतील..आज त्यांचा वाढदिवस आहे.. त्यानिमित्ताने हे गीफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ.. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करतील असे केदार शिंदे यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment