हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करडा कमिशनर, इन्स्पेक्टर महेशचे बॉस, गावचे पाटील, नायिकेचे वडील अशा विविधांगी चरित्र भूमिकामधून मराठी मनात आपली छाप सोडणारे जेष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.
सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जन्म जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. मात्र, इन्स्पेक्टर महेशचे बॉस म्हणून त्यांची भूमिका आजही मराठी प्रेक्षजकांच्या आठवणीत आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यासोबतच जयराम यांची पडद्यावरील जुगलबंदी आजही मराठी प्रेक्षकांचे तितकेच हसवते.
काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.