Thursday, March 23, 2023

झेंडूची शेती करणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  मिळते आहे १०-१६ हजार रुपये अनुदान 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे.  पारंपरिक शेती सोडून इतर काही चांगले करू पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकार अनुदान देते आहे. उत्तर प्रदेश मधीलसहारनपुर जिल्ह्यातील उद्यान विभागातर्फे आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत झेंडूच्या फुलांच्या शेतीच्या वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी त्यांनी १४ हेक्टर शेतीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या श्रेणी नुसार सामान्य शेतकऱ्यांना ७ हेक्टर आणि छोट्या तसेच सीमांत शेतकऱ्यांसाठी ७ हेक्टरपेक्षा कमी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या परिसरात साधारण १५० हेक्टर क्षेत्रफळात झेंडूची शेती केली जाते आहे.

जिल्ह्यातील  नागल, बलियाखेड़ी, नकुड़ आणि पुंवारका विकास खंड यासारख्या भागात मोठ्या प्रमाणात झेंडूची शेती केली जाते. यामध्ये आता सामान्य शेतकऱ्यांना १० हजार आणि लढू तथा सीमांत शेतकऱ्यांसाठी १६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. झेंडूची शेती शेतकऱ्यांसाठी  फायदेशीर आहे  इथल्या शेतकऱ्यांचे आहे. पूसा नारंगी, पूसा बसंती और अफ्रीकन टाल या प्रजातींची शेती इथे केली जाते. येथील उद्यान अधिकारी कुमार यांनी या क्षेत्रात १५० हेक्टर जागेत ही  शेती केली जात असून ऑगस्ट, जानेवारी आणि मार्च मध्ये यांची लागवड होते असे सांगितले.

- Advertisement -

या शेतीचा कालावधी चार महिने इतका असतो. प्रति हेक्टर यांचे उत्पन्न साधारण २५० क्विंटल असे असते आणि याची विक्री प्रति किलो ३० रुपये अशी होते. या फुलांची विक्री स्थानिक बाजारात, मंडईत तसेच दिल्ली, हरिद्वार, अंबाला, चंदीगड आणि डेहराडून मध्ये मध्ये केली जाते.