आज शेअर बाजार तेजीत बंद, Sensex पुन्हा एकदा 51000 च्या वर गेला तर Nifty मध्ये झाली खरेदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजच्या दिवसातील चढ-उतारांच्या दरम्यान बाजारात चांगली वाढ दिसून आली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 584.4 अंक म्हणजेच 1.16 टक्क्यांच्या तेजीसह पुन्हा एकदा बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांक 81.70 अंकांच्या म्हणजेच 0.55 टक्क्यांच्या तेजीसह 15,037.90 वर बंद झाला. याशिवाय बँक निफ्टी निर्देशांक 589.90 अंकांच्या वाढीसह 35865.70 च्या पातळीवर बंद झाला आहे.

सेक्टरल इंडेक्स
सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलतांना, आज ऑटो, कॅपिटल गुड्स, बीएसई हेल्थकेअर, मेटल, ऑईल अँड गॅस, पीएसयू रेड मार्कवर बंद झाले. या सर्व क्षेत्रात विक्री झाली. याशिवाय बँक निफ्टी कंझ्युमर ड्यूरेबल्स, एफएमसीजी, आयटी आणि टेक क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

आजच्या व्यापारात स्मॉलकॅप, मिडकॅप आणि सीएनएक्स मिडकॅप निर्देशांकात घट झाली. स्मॉलकॅप निर्देशांक 85.56 अंकांच्या खाली 20981.64 वर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक 137.22 अंकांनी घसरून 20512.22 च्या पातळीवर बंद झाला. त्याशिवाय सीएनएक्स मिडकॅप 125.00 अंकांच्या घसरणीसह 24024.30 च्या पातळीवर बंद झाला.

या शेअर्समध्ये घट झाली
बीएसईच्या पहिल्या 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स रेड मार्कवर बंद झाले आहेत. सर्वात मोठी घसरण पॉवरग्रीडमध्ये झाली. याशिवाय ओएनजीसी, एनटीपीसी, डॉ. रेड्डी, भारती एअरटेल, एसबीआय, सन फार्मा, एलटी, आयटीसी, रिलायन्स आणि बजाज ऑटो यांची विक्री झाली.

या शेअर्समध्ये खरेदी केली
आज वाढत्या शेअर्समध्ये कोटक बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, टेकएम, बजाज फिन, एशियन पेंट्स, टीसीएस, बजाज फिनस्व, एचसीएल टेक, एचयूएल, इन्फोसिस, मारुती, अ‍ॅक्सिस बँक, टायटन सर्व ग्रीन मार्कवर बंद झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment