Tuesday, February 7, 2023

शुभमंगल नाही कोरोना सावधान ! विवाह सोहळे रद्द

- Advertisement -

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

सध्या जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी  सावधानता व बचाव हाच इलाज असल्याने, या घातक आजारापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये व यातून रोग प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेतल्या जात आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, यात्रा, महोत्सव रद्द करण्यात आले आहेत. कोव्हीड १९ व्हायरस चा प्रसार होवू नये म्हणून १९ मार्च चे परभणी जिल्हातील बरेच विवाह सोहळे रद्द झाले असल्याची माहिती येत आहे. त्यामुळे आज  एखाद्या विवाह सोहळ्याला जाण्यापूर्वी  विवाह सोहळा रद्द न झाल्याची खातरजमा करूनच पुढचा बेत आखावा लागणार आहे. परभणीतील जाधव कुटुंबीयांनी प्रशासनाच्या हाकेला ओ देत आपल्या डॉक्टर मुलीचा आज होणारा विवाह सोहळा मित्र पाहुणे मंडळी यांची काळजी करत, आरोग्य दक्षता दाखवत रद्द केला आहे.

- Advertisement -

   परभणी जिल्ह्यातील धारासुर येथील रहिवासी असणारे प्रगतीशील शेतकरी व राजकीय प्रस्थ असणारे अच्युतराव जाधव यांच्या  डॉक्टर असणाऱ्या मुलीचा विवाह हल्ली औरंगाबाद राहणाऱ्या टकले पाटील यांच्या डॉक्टर  मुलाशी गुरुवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ६ .३० वाजता करण्याचे ठरवले होते. त्यासाठी तीन हजार निमंत्रण पत्रिका पाचशे मूळ पत्रिका व दोन हजारहून अधिक  मित्र पाहुण्यांना वेळेअभावी मेसेज द्वारे निमंत्रण देण्यात आले होते .प्रत्येक आई-वडीलां प्रमाणे अच्युतराव जाधव यांनीही मुलीचा विवाह थाटामाटात  व्हावा यासाठी परभणीतील मंगल कार्यालय किरायाणे केले होते. अक्षदा, भोजन व्यवस्था ते आतिषबाजी पर्यंतची लहान मोठी सर्व व्यवस्था चोख करण्यात आली होती. घरि पाहूण्यांचा राबता वाढला होता. सर्व लग्नघाईचे वातावरण असताना काल १८ मार्च रोजी नवरा मुलगा हळदीसाठी ही येणार होता. पण तत्पुर्वी कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. अधिकची माणसे एकत्रित येऊन  गर्दी टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व येणाऱ्या पाहुण्यांच्या आरोग्याची चिंता करत जाधव परिवार यांनी त्यांच्या व्याही असणाऱ्या औरंगाबाद येथील टकले पाटील परिवाराशी चर्चा करत हा विवाह सोहळा कोरोना व्हायरसचा धोका टळेपर्यंत लांबणीवर टाकण्याचे ठरवले.

जमेल त्या माध्यमाने निमंत्रण दिलेल्या पाहुण्यांना गैरसोय होऊ नये म्हणून अत्यंत काळजीने हा संदेश पोहोचविण्यात आला.जाधव व टकले पाटील परिवार यांच्या सारखेच सावधानता,बचाव हाच इलाज असल्याने  जिल्हातील इतर ठिकाणी ही विवाह सोहळे रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. अच्युतराव जाधव यांच्या परिवाराप्रमाणे इतरही जिल्हावासीयांनी  पुढील काही दिवस धाडशी निर्णय घेत , तत्परता व मनाचा मोठेपणा दाखवत  आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणारा निर्णय घेतल्यास खऱ्या अर्थाने  कोरोना व्हायरस विरुद्ध लढता येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा