Maruti Suzuki च्या गाड्या झाल्या महाग; पहा कोणती गाडी किती रुपयांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजपासून म्हणजेच 18 एप्रिलपासून मारुती सुझुकीची कार घेणे महाग झाले आहे. खर्चात वाढ झाल्याचा दाखला देत कंपनीने कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, 18 एप्रिल रोजी सर्व मॉडेल्सच्या किंमती सरासरी 1.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मारुती सुझुकीने 6 एप्रिल रोजी किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. याआधी 1 एप्रिलपासून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, टोयोटा या कंपन्यांनी देखील आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. त्याचवेळी टाटा मोटर्सनेही आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती 2.5 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत.

मारुती सुझुकीने जारी केलेल्या निवेदनानुसार खर्चात वाढ झाल्याने किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी या महिन्यात वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. मॉडेलनुसार वाहनांच्या किंमती वाढवल्या जातील. गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कंपनीच्या मार्जिनवर परिणाम होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने आता वाढीव खर्चाचा काही भाग ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उत्पादनांच्या किंमती वाढवल्या जात आहेत.

1 एप्रिलपासून अनेक कंपन्यांनी किंमती वाढवल्या
1 एप्रिल 2022 पासून टोयोटा, मर्सिडीज, ऑडीसह अनेक ऑटो कंपन्यांनी देखील आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सनेही आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीवाढवल्या आहेत. ऑटो कंपन्यांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारात कमोडिटीजच्या किंमती वाढल्यामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे. यामुळे कंपन्यांनी उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सर्व उत्पादनांच्या किंमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. बीएमडब्ल्यू आणि ऑडीच्या गाड्याही 3.5 टक्क्यांनी महागल्या आहेत. मर्सिडीजनेही 1 एप्रिलपासून किंमतीत 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर, टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती 2.5 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत.

Car मॉडेल    किंमत
wagonr      5,39,500
swift          5,73,000
Ertiga        11,29,000
Baleno       6,35,000

Leave a Comment