सेल्फीच्या नादात स्विफ्ट कार ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत कोसळली, 3 जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जणांनी आपला जीव गमावल्याच्या घटना पहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशीच एक घटना पुणेमध्ये घडली आहे. सेल्फीच्या मोहापायी कार रस्त्याच्या बाजूला घेत असताना गाडी थेट 500 फूट खोल ताम्हिणी घाटामध्ये दरीत कोसळली (accident). या अपघातात (accident) 3 जणांचा मृत्यू झाला. पुणे-माणगाव या राष्ट्रीय महामार्गावर ताम्हिणी घाटात हा भीषण अपघात (accident) झाला.

काय घडले नेमके ?
मंगळूरपीर वाशिम येथील पर्यटक MH 12 HZ 5535 या मारुती स्विफ्ट कारने पुण्यावरून देवकुंड या ठिकाणी जात होते. 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 04.30 वाजण्याच्या दरम्यान कोंडेथर- सणसवाडी गावचे हद्दीत आली होती. त्यावेळी सेल्फी काढण्यासाठी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला पण तीव्र उतार आणि वळणावर ड्रायव्हरने ब्रेक मारला असता गाडी चिखलामध्ये स्लीप होऊन डोंगर उतारावरून घसरली (accident) आणि थेट 500 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात (accident) झाला.

हा अपघात (accident) इतका भीषण होता की, यात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. कार मधील 3 जण ठार झाले आहेत तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात (accident) ऋषभ किशोर चव्हाण, कृष्णा पंडित राठोड, सौरभ श्रीकांत भिंगे या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रोहन परशुराम गाडे, प्रवीण गजानन सरकटे, रोहन किशोर चव्हाण हे तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय माणगाव या ठिकाणी उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर