कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड-पाटण रोडवरील वारुंजी गावाच्या हद्दीत कराड विमानतळा नजीक बावडेकर मसालेवाले यांच्या गोदामाला मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले.कराड नगरपालिकेच्या अग्निशामक दलासह परिसरातील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून आग तात्काळ आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके अधिकृत कारण समजू शकले नाही मात्र इमारतीच्या शेजारीच असलेल्या या खुल्या जागेतील पालापाचोळा पेटवला होता. यातील ठिणगी संबंधित ठिकाणी पडल्याने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही आग इतकी भीषण होती की कराड पालखीच्या एका अग्निशामक गाडीला आग विझविणे आवाक्याबाहेर गेल्याने दुसरी ही गाडी तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आली होती. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नातून अग्निशामक दल व नागरिकांनी आग पूर्णपणे विझविली.
बावडेकर मसाले वाली यांच्या मसाले फॅक्टरीच्या वरच्या मजल्यावर उत्पादित मालाचे पॅकिंग करण्याचे साहित्य साठा करून ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी आगीची दुर्घटना घडली यात करण्याचे पॅकिंग करण्याचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.