Tuesday, January 31, 2023

चोरट्यांकडून मेडिकल दुकान फोडून सॅनिटायझर व मास्कची चोरी

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्ह्याचा अचलपूर येथे एकाच रात्री चोरट्याने तीन मेडिकलची दुकाने फोडून त्यातील मास्क व सॅनिटायझर चोरून नेले आहे. त्याचबरोबर दुकानातील काही पैसे सुद्धा चोरून नेल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

अचलपुरातील प्रवीण एजन्सी, गौरव मेडिकल व कृष्णा मेडिकल येथे काल एका पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय चोरट्याने रेनकोट, रॉड व चाकूच्या सहाय्याने मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये असणारी ड्रॉव्हरमधील पैसे तसेच मास्क व सॅनिटायझर चोरून नेल्याची घटना घडलेली आहे. आतापर्यंत चोरट्याने सोन्या चांदीची दुकाने लुटल्याच्या घटना आपण बघितल्यात पण मेडीकल दुकान फोडून मास्क व सॅनिटायजर चोरून नेले असल्याची आताची ही पहिलीच घटना असल्याचे लक्षात येत आहे. तीनही दुकानांमधून रोकड मोठ्या प्रमाणावर नेली नसल्याचेही यावेळी लक्षात आले.

एका दुकानातील सहा हजार तर दूसर्‍या दुकानामधून पाचशे रुपये व सनीटाईझर चोरी केली असल्याचे सकाळी उघडकीस आले. पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा