लासलगाव येथील कांद्याच्या गोदामला भीषण आग

नाशिक | नाशिक येथील लासलगाव निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव – विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामात असलेल्या लाखो रुपयांचा कांदा हा जळून खाक झाला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. इथून कांदा निर्यात देखील केला जातो. सुरणा हे इथले हे इथले कांदा निर्यातदार आहेत. त्यांनी मोठ्या खड्यात कांदा साठवणूक करून ठेवला होता. या कांद्याच्या गोदामात मजूर देखील काम करत होते. अचानक आग लागलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आणि मजुरांनी या खळ्यातून पळ काढला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी या घटनेत झाली नाही. मात्र आग इतकी भीषण होती की आगीचे लोळ आणि काळा धूर सर्वदूर पसरलेले होते.

दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. या भीषण आगीमुळे मात्र सुराणा यांचा लाखो रुपयांचा कांदा जळून खाक झाला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like