दहिवडी कोविड सेंटरला शेखर गोरे यांच्याकडून 18 ऑक्सिजन बेडसह साहित्याची मदत 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माण खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी माण खटाव शिवसेनेचे युवानेते शेखर गोरे यांनी दहिवडी येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन लाईनसहित 18 ऑक्सिजन बेड व सेंटरसाठी आवश्यक साहित्याची मदत केली आहे.

माण खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांना बेड उपलब्ध होऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी शेखर गोरे कोविड सेंटर उभारणार होते. मात्र सेंटरसाठी ऑक्सिजनसह आवश्यक सर्व साहित्य दिले, तरी त्याठिकाणी रूग्णांवर उपचार करून त्यांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स व कर्मचारी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे कोविड सेंटरचा निर्णय बदलत त्यांनी दहिवडी सेंटरला साहित्य दिले. दहिवडी येथील कोरोना सेंटरला ऑक्सिजन बेडची नितांत गरज होती.

याठिकाणी ऑक्सिजन रूमचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सुरेखाताई पखाले, माजी सभापती कविता जगदाळे, पं. स.सदस्य विजयकुमार मगर, आरोग्य अधिकारी लक्ष्मण कोडलकर, गटविकास अधिकारी एस.बी. पाटील, सपोनि आर. पी. भुजबळ, डॉ. लोखंडे, डॉ. ओंबासे,डॉ. अहिवळे, चेअरमन रवी जाधव, राहुल गोरे, तेजस पवार, मोहसिन शेख आदींची उपस्थिती होती

Leave a Comment