केंद्रीय मंत्री नारायण राणेंची वकिलांसोबत बैठक सुरु….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. या संदर्भात चिपळूण येथील जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यापूर्वी मंत्री नारायण राणेंनी आपल्या वकिलांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून अटकेपूर्वी कोणत्या कायदेशीर गोष्टी कराव्यात याची माहिती मंत्री राणे घेत आहेत.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलयानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.केंद्रीयमंत्री राणेंनी काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यानंतर मंत्री राणेंच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध केला जात आहे.

दरम्यान नारायण राणेंनी आपल्या वकिलांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत ते सध्या बैठक घेत आहेत. त्यातून त्यांच्याशी चर्चा करून अटक टाळण्यासाठी कोणते कायदेशीर मार्ग अवलंबवावे, याबाबत माहिती घेत आहेत.

Leave a Comment