मेळघाटात पुन्हा आढळला स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह; मागील ८ दिवसातील सलग दुसरी घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये आठ दिवसांपूर्वी एका नदी पात्रात एक दिवसाचे कुपोषणग्रस्त स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणामुळे मेळघाटातील कुपोषणाचा चेहरा प्रखरतेने सर्वांसमोर आला होता.या घटनेचा कसून तपास पोलीस करत होते. मात्र हि संपूर्ण घटना ताजी असतानाच आज पुन्हा धारणी शहराजवळील दिया फाट्या जवळ एका नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज सकाळी येथील काही वाटसरूंना एका नवजात बालकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर काही वाटसरूंनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासणी केली असता एका पिशवीमध्ये बालकाचा मृतदेह आढळून आला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

मात्र धारणी शहरातील ह्या आठवड्यातील सलग दुसऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या पुर्वी धारणी शहरालगत असलेल्या काली माता मंदिर, मांडवा रोड जवळुन वाहणाऱ्या नदीत मोटर सायकल स्वार व्यक्तीने स्त्री जातीचे एक दिवसाचे नवजात अर्भक कपड्यात गुंडाळुन फेकले होते. याचा तपास पोलिस करत असतानाच आज पुन्हा दिया फाट्या जवळ नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने परीसरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. सध्या दोन्ही प्रकरणाचा तपस पोलीस करत आहेत.

Leave a Comment