धक्कादायक! वाहनामध्ये लैंगिक अत्याचार करून तरुणीला नग्न अवस्थेत रस्त्यावर सोडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । तरुणीवर वाहनात लैंगिक अत्याचार करून रस्त्यावर नग्न अवस्थेत सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. नगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. आरोपीने पीडित तरुणीला रस्त्यावरच नग्न अवस्थेत सोडून दिल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील असून तिच्यावर शिंगवे नाईक (ता. नगर) येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत.

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्याविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी अभय बाबूराव कडू (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

सोमवारी सकाळी नगर शहरातील चांदणी चौक येथे एक तरुणी निर्वस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिली. त्यानंतर संस्थेच्या डॉ. सुचिता धामणे या तेथे आल्या. तेव्हा त्यांना संबंधित पीडित युवती खूप आरडाओरड करत असल्याचे दिसले. माझ्यावर कडू नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला, असे ही पीडित युवती म्हणत होती. धामणे यांनी या तरुणीला एका रुग्णवाहिकेतून आपल्या संस्थेत नेले. तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी पीडित तरुणीला मानसिक धक्का बसल्याने ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. काल सकाळी मात्र ती आरडाओरड करू लागली. त्यावेळी डॉ. धामणे यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, तिने तिचे नाव सांगून वर्धा जिल्ह्यात राहत असल्याचे सांगितले. तसेच अभय कडू नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगत तिने सर्व घटनाक्रम सांगितला.

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!

पुणे येथून अभय कडू याच्याबरोबर येत असताना त्याने नगरच्या जवळ रेल्वेपूल ओलांडल्यानंतर गाडी अंधारात थांबवली व अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. त्यानंतर तातडीने डॉ. सुचिता धामणे यांनी याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी अभय बाबुराव कडू याच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. मुंढे करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

साखरपुडा झालेल्या तरुणीचे प्रियकराने मोटारसायकलवर येऊन केले अपहरण

गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Leave a Comment