उन्हाचा पारा चढला : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सकाळच्या सत्रात रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील आज सकाळच्या सत्रात होणा-या सर्व लढती उन्हाचा तडाखा वाढल्याने रद्द करण्यात आल्या आहेत. साताऱ्यात तापमानाचा पारा 39 अंशावर गेला आहे. तर थंड हवेचे ठिकाण असलेलं महाबळेश्वरचा तापमानाचा पाराही 33 अंशावर गेला आहे. ऊन्हाचा तडाका वाढल्याने सकाळच्या कुस्त्या रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र कुस्ती परिषदेने घेतला आहे.

सातारा येथे 5 एप्रिलपासून ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात घेण्यात येत आहेत. या स्पर्धेत रंगत आलेली असून राज्यातून 900 हून अधिक पैलवानांनी हजेरी लावलेली आहे. तर सातारकरांनीही या स्पर्धेला प्रतिसाद दिला आहे. मात्र, उन्हाचा तडका वाढल्याने पैलवान तसेच कुस्तीशाैकिनांना त्रास होवू लागला आहे.

गुरूवारी दि. 7 रोजी सकाळच्या सत्रातील लढती रद्द करण्यात आल्या आहेत. संयाेजकांनी दिलेल्या माहितीनूसार आज सायंकाळी 5 नंतर महाराष्ट्र केसरीसह अन्य वजन गटातील लढती हाेतील. या स्पर्धेचा अंतिम दिवस 9 एप्रिल असणार आहे.

Leave a Comment