हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेट्रोने (Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इथून पुढे मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाही. आता थेट WhatsApp वरून तुम्ही मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचण्यासही मोठी मदत होणार आहे. मेट्रो ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी, आणि लोकांचा वेळ वाचण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून तिकीट सेवा सुरू केली आहे.
ही तिकीट प्रणाली QR कोडद्वारे ई-तिकीट तयार करते. डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी या ऑनलाईन सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेमुळे वेळेची तर बचत होईलच परंतु मुख्य म्हणजे तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून प्रवाशांचीही सुटका होणार आहे. WhatsApp वरून मेट्रोचे तिकीट कस बुक करायचं हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
‘या’ Steps फॉलो करा-
सर्वप्रथम DMRC चा अधिकृत WhatsApp क्रमांक 9650855800 तुमच्या फोनच्या संपर्क यादीमध्ये जोडा. तुम्ही चॅटबॉट QR कोड स्कॅन करू शकता जो सर्व विमानतळ एक्सप्रेस लाईन तिकिटांवर आणि ग्राहक सेवा डेस्कवर प्रदर्शित होतो. WhatsApp वरून 9650855800 या क्रमांकावर “हाय” असा मेसेज पाठवा. त्यानंतर लिस्टमधून तुम्हाला हवं असलेलं ठिकाण निवडा. त्यानंतर तिकीट खरेदी, शेवटच्या प्रवासाचे तिकीट, किंवा तिकीट पुनर्प्राप्त करण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर सोर्स स्टेशन आणि डेस्टिनेशन निवडा आणि तुम्हाला किती तिकिटे खरेदी करायची आहेत सिलेक्ट करा.
त्यानंतर इंटीग्रेटेड पेमेंट गेटवे चा वापर करून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI वापरून सुरक्षितपणे पेमेंट करा. त्यानंतर तुम्हाला WhatsApp चॅटमध्ये QR कोड तिकीट मिळेल. तुमच्या स्मार्टफोनवरील QR कोड योग्य AFC गेट स्कॅनरवर स्कॅन करा आणि कोणत्याही झंझटीशिवाय मेट्रोचा प्रवास करा.