Tuesday, January 31, 2023

मुंबई चमत्कार करणार?? 170 धावांनी हैदराबादचा पराभव करावा लागणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्स ला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध फक्त विजयच नको तर तब्बल 170 धावांनी पराजित करावं लागेल. एवढंच नव्हे तर मुंबई जर टॉस हरली तरी मुंबई सामन्यापूर्वीच आयपीएल मधून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात आपल्या कामगिरी सोबतच नशिबाचीही साथ मिळण मुंबई साठी गरजेचं आहे.

171 धावांचा फरक ठेऊन विजय मिळवला तरच मुंबई इंडियन्सचं नशीब चमकवेल. आणि त्याची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढेल. म्हणूनच आज मुंबई इंडियन्सला त्यांच्या फलंदाजांची जास्त गरज आहे. रोहित शर्माला त्याच्या हिटमॅनचं रुप घ्यावं लागणार आहे.

- Advertisement -

कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, मागील सामन्यातील सामनावीर ईशान किशन यांच्यासह कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या याना वादळी खेळी करावी लागेल. मुंबईची फलंदाजी ही खऱ्या अर्थाने संघासाठी डोकेदुखी ठरली असली तरी आजच्या करो वा मरो सामन्यात मुंबईला नक्कीच काहीतरी चमत्कार करावा लागेल.