बिल गेट्स यांनी केले भारतीय फार्मा कंपन्यांचे कौतुक! म्हणाले,” ते संपूर्ण जगासाठी कोरोनाची लस बनवू शकतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतीय फार्मा इंडस्ट्रीच्या ताकतीबद्दल सांगितले, ते म्हणाले कि,”भारतामध्ये बरीच क्षमता आहे. भारतीय औषध कंपन्या आणि लस कंपन्या या जगभरात मोठ्या प्रमाणावर पुरवठा करतात. तुम्हाला माहिती आहे, भारतात इतरांपेक्षा जास्त लस तयार केल्या जातात. यामध्ये सीरम इंस्टीट्यूट ही सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि विश्वस्त बिल गेट्स म्हणाले की,” भारतात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. तेथील फार्मा इंडस्ट्री कोरोनाव्हायरस वरील लस तयार करण्यास मदत करीत आहे, कारण इतर रोगांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्या विशाल क्षमतेचा त्यांनी उपयोग केला आहे.

बिल गेट्स म्हणाले – कोरोना लसीमध्ये भारत महत्वाची भूमिका बजावेल – बिल गेट्स म्हणतात की,बायो ई, भारत बायोटेक आणि इतर कंपन्या देखील आहेत. हे सर्व कोरोनाव्हायरस वरील लस तयार करण्यास मदत करत आहेत. ज्या प्रकारे त्यांनी इतर रोगांच्या लसींसाठी आपली क्षमता दाखवली आहे. सीरम इंस्टीट्यूट ही सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.

ते म्हणाले, “मी फार उत्सुक आहे की, भारतातील फार्मा इंडस्ट्री या केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी लस तयार करू शकतील. आपल्याला मृत्यूची संख्या कमी करण्याची आणि सुनिश्चित करणे आवश्यकता आहे कि, या रोगाचा नाश करण्याची प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये आहे.

बिल गेट्स म्हणाले की, बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन देखील सरकारचे भागीदार आहे आणि ते जैव तंत्रज्ञान विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाबरोबर विशेष कार्य करीत आहे.

कोरोना विषाणूविरूद्धच्या भारताच्या लढ्याविषयी एका डॉक्यूमेंट्री मध्ये गेट्स म्हणाले होते की, या आरोग्याच्या संकटामुळे भारतासमोर एक मोठे आव्हान उभे आहे. मोठ्या आणि दाट लोकवस्ती हे यामागील प्रमुख कारण आहे. या डॉक्यूमेंट्रीचा प्रीमियर गुरुवारी संध्याकाळी डिस्कवरी प्लसवर दाखविला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.