व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

थरारक चोरी : मध्यरात्री महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोने लुटले

फलटण | आदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथील एका घरातील महिलेच्या गळ्याला मध्यरात्री चाकू लावून तिच्या गळ्यातील सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद रंजना संपत बर्गे (वय- 45) यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे. लोणंद पोलिसांनी अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा नोंद दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील आदर्की गावात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यानी चोरी केली. रंजना बर्गे यांचे दार वाजवत घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवी हिसकावून घेतली. याच दरम्यान घरातील भांडी, डबे यामधून आणखी काय मिळतेय का? याचा शोधही घेतला.

याच दरम्यान घरामध्ये दोघे व घराबाहेर दोघेजण थांबले होते. ही घटना घडल्यानंतर चोरट्याने जाताना कोणाला काही सांगितले तर तुझा खून करेन अशी धमकीही दिली. या भीतीने रंजना बर्गे यांनी सकाळी उठल्यानंतर हा प्रकार 9 वाजता थेट पोलीस ठाण्यात येवून सदरील प्रकार सांगितला. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक पाडवी हे करत आहेत.