Military Education : आता पहिलीपासूनच मिळणार सैनिकी शिक्षण; दादा भुसेंची मोठी घोषणा

Military Education
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Military Education। राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणा पासूनच रुजावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार,माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एन्.सी.सी., स्काउट-गाइडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील असं दादा भुसे यांनी म्हंटल आहे. ‘समर युथ समिट २०२५’ या २ दिवसीय निवासी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते

देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार Military Education-

यावेळी दादा भुसे म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना नुकतेच सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना आढळून आल्याचे या शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात येत असून येत्या शैक्षणिक वर्षापासून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे (Military Education) प्राथमिक स्तरावरील शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.

एवढंच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांची सहल शेतकर्‍यांच्या बांधावर नेली जाईल. बळीराजा कशा प्रकारे कष्टाने पिकवतो, याची जाणीव त्यांना या माध्यमातून होईल. तसेच सहल बँकेत, रुग्णालयासह इतर विविध ठिकाणी नेतांना तेथील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाईल. गड-दुर्गांवर नेतांना गौरवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी हेल्थ कार्ड तयार केले जाणार आहे. सदर तपासणीत आजाराचे निदान झाल्यास, संबंधित विद्यार्थ्याला उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.