हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वसामान्य माणसाने वीजबील भरले नाही तर महावितरण त्याची वीज पुरवठा खंडीत करते. सध्या राज्यात विजेचं संकट निर्माण झालं असून ऊर्जा विभागही आर्थिक संकाटात आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील अनेक नेते आणि मंत्र्यांनी त्यांची वीजबिले थकवल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या सहित अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
उर्जा विभागाने थकबाकीदारंची यादी जाहीर केली आहे. यानुसार, ३० एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील आमदार, खासदार मंत्री यांची १ कोटी २७ लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे सर्वसामान्य माणसाने वीजबिल थकवले तर महावितरण लगेच वीज पुरवठा खंडित करते. अशा वेळी आता चक्क नेत्यांनीच वीजबिले थकवली असल्याने ऊर्जा विभाग काही कारवाई करणार का याकडे लक्ष्य लागले आहे.
पहा कोणकोणत्या नेत्यांची वीज बिल थकीत-
रावसाहेब दानवे – 70 हजार रुपये
राजेश टोपे- 4 लाख
नाना पटोले- 2 लाख 63 हजार
अनिल देशमुख- 2 लाख 25 हजार
विश्वजित कदम- 20 हजार
प्रकाश सोळंकी- 80 हजार
रणजित सिंह निंबाळकर- 3 लाख
संदीप- क्षीरसागर- 2 लाख 30 हजार
आशिष जैस्वाल- 3 लाख 35 हजार
जयकुमार गोरे- 7 लाख
रवी राणा- 40 हजार रुपये
सुहास कांदे- 50 हजार रुपये
विजयकुमार गावित- 42 हजार रुपये
सुमन सदाशिव खोत- 1 लाख 32 हजार