जसा राज्यपालांना तसाच मंत्रिमंडळालाही मान आहे, टाळी एका हाताने वाजत नाही- छगन भुजबळ

नाशिक । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 11 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होतं. यानंतर राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. या प्रकरानंतर महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. या टीकेला उत्तर देत राज्याचे अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कानऊघडणी केली आहे.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील तणाव वाढत चालला आहे. एकमेकांचा मान सन्मान राखण गरजेचं आहे. राज्यपालांचा जसा मान आहे. तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. टाळी एक हाताने वाजत नाही. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहिजे. मंत्रिमंडळाने दिलेल्या 12 विधानपरिषदेच्या आमदारांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेलना नाही,” असे भुजबळ म्हणाले. तसेच राज्यपाल आणि CMO या दोघांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले “मी 1985 पासून विधानमंडळात आहे. मात्र, असे कधीही घडलेलं मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यानी नाव पाठवल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमदारांच्या नावावर सही व्हायची. अटलजींच्या, शिवसेनेच्या काळातदेखील असंच होतं. 1995 साली काँग्रेसप्रणित राज्यपाल होते. त्यावेळी अचानक सरकार बदललं. मात्र तरी सुद्धा राज्यपालांनी तत्काळ त्यावर सही केली. त्यामुळे राज्यात कोण जास्त राजकारण खेळतंय हे पाहणं गरजेचं आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी राजकारण करू नये असा शिरस्ता आहे” असं भाष्य भुजबळ यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवर केले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like