नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात ; वाशी टोल नाक्याजवळ झाला अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत झालंचं समजतंय. अंगठ्याची दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत पाहायला मिळाले होते. आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करत आहेत.

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात असल्याचा दावा केला जात होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment