मंत्री संतापून पत्रकार परिषदेत म्हणाले… नवीन आहेस, मग घरी जा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि शिंदे- भाजप सरकार मधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री चांगलेच संतापलेले पहायला मिळाले, चक्क लाईट गेल्याच्या कारणावरून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला झापले.

मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद घेण्यासाठी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. त्याआधी काही मिनिटे अचानक तेथील लाईट गेली. अचानक वीज गेल्याने मंत्री देसाई संतापले. त्यांनी राज्य उत्पादन विभागाच्या एका अधिकाऱ्याला बोलावून घेऊन आत्ताच लाईट कशी गेली? अशी विचारणा केली. त्यावेळी, “साहेब मला माहित नाही…मी नवीन आहे…,” असे त्या अधिकाऱ्याने मंत्री देसाई यांना नम्रपणे सांगितले. मात्र संतापलेल्या मंत्री देसाई यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

पुढे मंत्री श्री. देसाई म्हणाले, तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का? दुसरा कोण अधिकारी आहे, तुझ्या सोबत. लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास, असा दमच त्यांनी अधिकाऱ्याला भरला. तसेच पीए व अधिकाऱ्यांनी त्याला समजून सांगा, मला असले चालत नाही असे सांगून त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली.