या मातेकडे काय पुरावा मागणार? ; मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : नागरिकत्व दुरुस्ती कायदा(CAA) तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC) यांच्याविरोधात देशभर निदर्शने अजूनही सुरू आहे. भाजपकडून या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली, सभा घेण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थिती CAA मागे घेणार नाही, असे अमित शहा लखनऊच्या सभेत बोलले आहेत.

या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ सादर करणाऱ्या कुटुंबाचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत बाई मुलाला कडेवर घेऊन आडव्या काठीवर उभा राहिली राहिली आहे. खालील फोटोत आपण पाहू शकता. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या बाईकडे बोट दाखवत दोन जळजळीत प्रश्न मोदी सरकारला विचारले आहेत. त्यांनी म्हंटले की,या माते कडे काय पुरावा मागणार ?हा संगळा संसार अंगाखांद्यावर उचलुन धरलेल्या ह्या बापाकडे मागता का पुरावा?

देशात CAA म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाला आहे. याबरोबरच देशात NRC म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी प्रकिया राबवली जाणार आहे. देशातील नागरिकांना कागदपत्रे सादर करून स्वतःच नागरिकत्व सिद्द करावा लागणार आहे. या मुद्यावरून आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ज्यांना रहायला घर नाही असे अनेक भटके लोक या देशात आहेत ते नागरिकत्व सिद्ध कसे करणार असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. या आधी प्रकाश आंबेडकर यांनी देखील अशाच प्रकारचे प्रश्न उपस्थित केले होते.

Leave a Comment