Sunday, January 29, 2023

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू का मांडत नाहीत? गृहराज्यमंत्री देसाई म्हणतात..

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यातील कथिक मंत्र्याचं यांचं नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून मंत्री संजय राठोड हे अज्ञात स्थळी आहेत. यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकार वर टीका करत असतानाच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मात्र संजय राठोड यांनी पाठराखण केली आहे.

संजय राठोड प्रकरणात पोलीस संजय राठोड यांचा तपास का करत नाहीत ? यावर बोलताना ते म्हणाले की संजय राठोड प्रकरणात पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत असून शासनस्तरावरून त्यात हस्तक्षेप केला जात नाही . वरिष्ठ अधिकारी सर्व बाबी व माहिती संकलित करून योग्य तो निर्णय घेतील असे सांगून संजय राठोड कुठेही लपून बसलेले नाहीत.संजय राठोड यांना कशाचीही भीती असण्याच कारण नाही अस शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

- Advertisement -

संजय राठोड हे सर्व लोकप्रतिनिधी /मंत्र्यांच्या संपर्कात आहेत.योग्य वेळ येताच ते माध्यमांसमोर आपली बाजू मांडतील संजय राठोड यांच्याशी अजित दादांनी संपर्क साधुन यवतमाळ जिल्ह्यातील लॉकडाउनची कल्पना दिली आहे अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’