Tuesday, February 7, 2023

मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली  जिल्ह्याच्या  पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात वर्षा गायकवाड थोडक्यात बचावल्या असून पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.

हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड ९ जुलैपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. ताफा पिपल्स बँकेजवळ आला असता याच वेळी मोंढ्यातून भरधाव वेगाने एक पिकअप टेम्पो मुख्य रस्तावर येत होता. काही कळायच्या आत पालकमंत्री गायकवाड यांच्या वाहनावर टेम्पो धडकला.

- Advertisement -

प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी पीकअप चालकास ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले आहे .