तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून फोटो केले व्हायरल, नागपुरातील अल्पवयीन मुलाचा प्रताप

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणाने केलेला प्रताप ऐकून तुम्हालाही बसेल धक्का. यामधील तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करून त्यातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या अल्पवयीन आरोपीने गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या चुलत भावाने तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी मुलगा हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी सूचनापत्र देऊन आरोपीला पालकांच्या ताब्यात दिले आहे.

या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तहसील पोलीस या घटनेची पुढील कारवाई करत आहेत. या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन असून तो 17 वर्षांचा आहे. तर पीडित तरुणी हि 22 वर्षांची आहे. सोमवारी सायंकाळी पीडित तरुणी आंघोळीला गेली असताना या अल्पवयीन आरोपीने गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने त्या व्हिडिओमधून काही निवडक स्क्रीनशॉट्स काढून ते सोशल मीडियावर व्हायरलदेखील केले.

हि घटना समजताच पीडितेच्या चुलत भावाने या प्रकरणी आरोपी विरोधात तहसील पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला सूचनापत्र जारी केले. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपीला समज देऊन सोडून दिले आहे.

You might also like