सागर । मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर एका वृद्धासह तिघांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून पीडित मुलगी मोतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतमध्यरात्री रस्त्यावर मदतीसाठी याचना करत होती. स्थानिकांनी परिस्थिती लक्षात घेत तिला वाचले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा १२ वाजता मोतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर मदतीसाठी याचना करणाऱ्या मुलीला तेथील स्थानिकांनी वाचवले. मदत करणाऱ्या क्षितिज दीक्षित याने सांगितले की, तो घरात अंशुल आणि रितेश यांच्यासोबत गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. तर एका मुलीच्या रडण्याचा आवाजही कानावर आला. बाहेर येऊन पाहिले तर, मुलगी धावताना दिसली. ती प्रचंड घाबरलेली होती. तिला प्यायला पाणी दिले. तिला धीर दिला. त्यानंतर मुलीने आपबीती सांगितली.
एका वृद्ध व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली, असे तिने सांगितले. याबाबत मोहल्ल्यातील काही दक्ष नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आल्यानंतर सर्व जण मुलीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथून राम स्वरूप या ६५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. याशिवाय सुलतान आणि गगन या दोघा आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन मुलीने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गगन आणि सुलतान या दोघांनी तिला विहिरीत ढकलण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला राम स्वरूप याच्या घरी नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’