Thursday, March 30, 2023

संतापजनक! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी । चॉकलेटचे आमिष दाखवून एका दुकानदाराने दोन अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधम विरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गावातील एका किराणा दुकान चालकांनी एका शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्याघरात नेले त्या ठिकाणी त्यांच्यावर एकाच खोलीत दोघांवरही अत्याचार केला कुणाला हा प्रकार सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा या इसमाने दोघींना परिसरातल्या एका शेतात नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिक रित्या अत्याचार केला. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही या मुलींना दिली.

- Advertisement -

हा प्रकार पीडित मुलीपैकी एकीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार नोंदवली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी किराणा दुकान चालवणाऱ्या बाबुराव चौधरी नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने तापासचक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.