शिवसेना हिदुस्थानच्या राजकारणातील चमत्कार, हिदुत्वांचा बुलंद आवाज : संजय राऊत

शिवसेनेचा आज 55 वा वर्धापनदिन

मुंबई | शिवसेनेचे संघटन, विचार वेगळा आहे. पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी लहानातील लहान कार्यकर्त्यांला बळ दिले. हिदुस्थानच्या राजकारणातील शिवसेना एक चमत्कार आहे. हिदुंत्वांचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

आज शिवसेनेचा 55 वा वर्धापनदिन आहे. याविषयी संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले, शिवसेनेने मराठी माणसावरील अन्याय दूर केला. मराठी माणसाला शिवसेना आपली वाटते, मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना आहे. देशातील राजकारणात शिवसेना पुढे गेलेली पहायला मिळेल. आम्ही सत्तेत असू अथवा नसू परंतु शिवसेनेचा आवाज असेल. आमच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष राहिल. 

दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे शिवसेनेसाठी 

दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे शिवसेनेसाठी लिहिले आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीत पोहचलेली आहे. पक्षप्रमुख बाळासाहेबांमुळे शिवसेना रूजली, वाढली. भविष्यात राष्ट्रीय राजकारणातही शिवसेना असेल, शिवसेनेचा आवाज पहायला मिळेल असेही संजय राऊत म्हणाले.

You might also like