धक्कादायक ! तपासणीच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : श्रीवर्धन शहरातील एका महिलेने डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो डॉक्टर श्रीवर्धन शहरातील बाजारपेठेत आपला दवाखाना चालवत होता. हाती आलेल्या माहितीनुसार ती महिला १९ एप्रिल रोजी ती महिला आपल्या छातीत दुखत असल्याने त्या डॉक्टरकडे गेली होती. त्यानुसार डॉक्टरने तपासायला सुरुवात केली.

तपासणी करताना त्या महिलेला डॉक्टरचा संशय आल्याने तिने आपण काय करत आहात असे विचारले तेव्हा डॉक्टरने मी तुमची तपासणी करत आहे असे उत्तर दिले. त्यानंतर डॉक्टरने आपल्यासोबत अपकृत्य केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यानंतर त्या महिलेने २० एप्रिल रोजी डॉक्टर विरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्या डॉक्टरचे वय ६६ वर्षे असून तो श्रीवर्धन मध्ये अनेक वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत आहे.

आरोपी डॉक्टर हा दमा,मधुमेह व उच्च रक्तदाब या व्याधींनी त्रस्त असल्याचे त्याच्या नातेवाईकाने सांगितले आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के.गावडे या करत आहेत.

Leave a Comment