कोरोना काळात चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | Covid च्या सभोवतालचा समाज माध्यमांवरील माहितीच्या साथीच्या आजाराचे बहुआयामी दृष्टिकोन – आस्था कांत, रिया गोलेचा

काही महिन्यांपूर्वीपर्यंत लोक जगाला एक चांगले ठिकाण कसे बनवता येईल याबद्दल विचार करत होते. त्यासाठी एचआयव्ही/एड्स, ट्युबरक्युलॉसिस, मलेरिया यासारखे आजार औषधे आणि सार्वजनिक आरोग्य यांच्या माध्यमातून बरे करण्याचा विचार करत होते. आज, एका नव्या रोगकारकापासूनचा आजार Covid-१९ हा मानवतेच्या क्षमतेला मध्यस्थी करण्याचे आणि या आजारामुळे उदभवलेल्या संकटाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान देत आहे. पण आज देश या विषाणूपेक्षा वेगळीच लढाई लढतो आहे. ते सुद्धा या भीती आणि चिंता पसरवणाऱ्या चुकीच्या धारणेच्या, एकूणच चुकीच्या माहितीच्या संसर्गाच्या विरोधात आहेत. विषाणू नवीन असल्याने त्याच्या माहितीचा अभाव आहे आणि त्याचा प्रचंड परिणाम आरोग्यावर होतो आहे. covid -१९ च्या माहितीची भूक खूप व्यापक आहे. विविध स्रोतांसह (संस्थात्मक आणि वैयक्तिक) माहितीची पोकळी भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण अनेकदा समाज माध्यमांवरील विरोधाभासी माहितीचा प्रसार करतो. या उद्रेकात जागतिक समुदायाने माहिती हाताळण्यासाठी विषाणूविषयी अधिक माहिती आणि चुकीची माहिती हे दोन्ही दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. 

चुकीची माहिती ही वस्तुस्थितीवर आधारित नसते ती जनमतावर प्रभाव पाडण्यासाठी अनावधानाने पाठवलेली असते किंवा सत्य अस्पष्ट करण्यासाठी पाठविलेली असते. त्याचे परिणाम हे खूप गंभीर आणि दूरगामी असतात. अलीकडे स्थलांतरित कामगारांना घरी घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वे कार्यान्वित केल्या जात असल्याची चुकीची माहिती व्हिडीओ ब्लॉग आणि समाज माध्यमांवर हेतुपुरस्सररित्या व्हायरल होते आहे. परिणामी सार्वजनिक आरोग्याची भीती निर्माण झाली आहे.  Harvard T H Chan School of Public Health चे डीन Michelle Williams आणि Harvard T H Chan School of Public Health चे प्राध्यापक K Viswanath यांनी अलीकडे एका लेखात चुकीच्या माहितीशी लढण्यासाठीच्या पाच मार्गांवर चर्चा केली आहे. यामध्ये १) असत्य माहिती पुसून टाकण्यासाठी सक्षम होण्यास covid -१९ विषयी स्वतःला शिक्षित करणे. २) एखादी माहिती सामायिक करण्यापूर्वी आणि पुढे पाठविण्याआधी थोडे थांबून त्याच्या सत्यतेच्या स्रोताचा विचार करणे. ३) भीती आणि असहिष्णुता पसरविणाऱ्या “संशयखोर वृत्ती”च्या औषधाची देखभाल करणे, जसे की संशोधक विषाणूविषयीची अधिक माहिती जाणून घेत आहेत त्याप्रकारे अनिश्चिततेची प्रचलित पातळी स्वीकारणे. ४) चुकीच्या माहितीने पोकळी भरून काढणे टाळणे. ५) माहितीचे भरवशाचे आणि विश्वसनीय स्रोत तपासून माहिती घेत राहणे. याचा समावेश आहे.

भारतासारख्या देशात जिथे समाज माध्यमांचा वापर व्यापक प्रमाणात प्रचलित आहे अशा ठिकाणी हे पुराव्याच्या आधाराचे सल्ले संबंधित आहेत. लोकांची मते आणि त्यांच्या क्रिया यांच्यावर प्रभाव पाडणारे समाजमाध्यम हे शक्तिशाली साधन आहे. या साथीच्या आजाराच्या सुरुवातीला समाज माध्यमांवर जणू काही आरोग्य तज्ञ असल्याचाच दावा करणारे तोतया व्हिडिओ फिरत होते. विविध सिद्धांतांवरील, अनेक चुकीचे, विषाणूच्या उत्पत्तीवरचे आणि chloroquine medication ची अधिक मात्रा घेऊन विषाणूपासून स्वतःला वाचविण्याच्या चुकीच्या संकल्पनांचे व्हिडीओ यांचा त्यात समावेश होता. विषाणूच्या प्रसारासाठी एका विशिष्ट समुदायाला राक्षस समजणारे व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. 

अनेक घटक चुकीच्या माहितीच्या विरोधात काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाज माध्यमांवरील वाढता धोका रोखण्यासाठी सरकार उपाय राबवित आहेत. दंतकथा आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न रोखण्यासाठी mygov.in, आयसीएमआर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयसारख्या वेबसाईटवर माहिती अपलोड केली जात आहे. टेलिकम्युनिकेशन विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या रिंगटोन काढून टाकण्यास आणि कोरोना विषाणूच्या माहितीची ऑडिओ क्लिप कॉलची रिंगटोन म्हणून वापरण्याचे आदेश दिले. चुकीची माहिती हाताळण्यासाठी  “MyGov Corona Help desk” आणि व्हाट्स अपचा चर्चा समूह ही सुरु करण्यात आला आहे. चुकीच्या माहितीचा प्रसार थांबविण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना खाजगी क्षेत्रही पाठींबा देते आहे. उदाहरणार्थ व्हाट्स अप नेही covid -१९ च्या चुकीच्या माहितीच्या प्रसारणाला प्रतिसाद म्हणून त्यांच्या संदेश पुढे पाठविण्याच्या मर्यादा आणि सुरक्षा सेटिंग कडक केल्या आहेत. इतके गहन प्रयत्न करूनही अजून आणखी बरेच काही करण्याची गरज आहे. अस्सल खाती सत्यापित करणे, माहितीच्या विश्वासार्ह स्रोतांना चालना देणे आणि चुकीची माहिती हाताळणाऱ्या संशोधनाचा निधी वाढविणे ही या दिशेने काम करण्याची पावले असू शकतात. समाज माध्यम दिग्गजांनी चुकीची माहिती रोखण्यासाठी आता मजबूत यंत्रणा राबविली पाहिजे. चुकीच्या माहितीच्या परिणामाचे विश्लेषण आणि त्याला सामोरे जाण्यासाठी साधने तयार करण्यासाठी संशोधकांना समाज माध्यम कंपनीकडून नियंत्रित केला जाणारा डाटा मिळविण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. या ‘चुकीच्या माहितीच्या साथीच्या’ या संकटकाळात आपण चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी आपण “मिश्र दृष्टिकोन” वापरला पाहिजे जिथे प्रणालीतील पुढाकाराने वैयक्तिक फायदा मिळू शकेल. वैयक्तिक पातळीवर Harvard T H Chan School of Public Health’s च्या भारतीय संशोधन केंद्राने कोरोना विषाणूवर दिलेल्या सल्ल्यानुसार “दोनदा विचार करा” हा मार्गदर्शक मंत्र आहे. संदेश पुढे पाठविण्याआधी, हे सत्य आहे का? याची कशी मदत होईल? याने काही प्रेरणा मिळेल? हे खरेच आवश्यक आणि योग्य आहे का? हे प्रश्न स्वतःला विचारा. समाजाला एकत्र येऊन सामाजिक नेतृत्वाच्या कामासाठी सक्रिय होण्याची संधी देत चळवळ उभी करण्याचीही आवश्यकता आहे. यामध्ये जागरूकता मोहीम उभी करणे, चुकीच्या माहितीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करणे याचा समावेश आहे. चुकीची माहिती रोखून आपल्या माहिती प्रणालीच्या लवचिकतेला संरक्षण देणे ही काळाची गरज आहे. 

आस्था कांत या Harvard T H Chan School of Public Health च्या भारतीय संशोधन केंद्रात प्रकल्प व्यवस्थापक आणि रिया गोलेचा या प्रकल्प समन्वयक आहेत. त्यांची ही मते वैयक्तिक आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

Leave a Comment