सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील नागरीकांचे वापरणेत येणारे मोबाईल हे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सातारा सायबर पोलीस ठाणे मार्फत गहाळ झालेल्या मोबाईलची तसेच चोरीच्या गुन्ह्यात गेलेले मोबाईलची तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत तब्बल 13 लाख रूपयांचे 82 मोबाईल सापडलेले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे इ. अंमलदार यांचे पथक तयार करुन सातारा जिल्हयातून गहाळ झालेले मोबाईल शोधकामी नेमणेत आले होते. नमुद पथकांनी मागील एक महिन्यात तांत्रिक माहितीचे अत्यंत तंत्रशुध्द पध्दतीने विश्लेषण करुन अंदाजे 13,00,000/- रु. किमतीचे 82 मोबाईल शोधुन ते ताब्यात घेणेत सायबर पोलीस पथकास यश आले आहे.
ज्या नागरीकांचे मोबाईल मिळुन आले आहेत. त्या नागरीकांना मोबाईल हे त्यांचेकडील कागदपत्रांची ओळख पटवुन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलीस ठाणे सातारा व सायबर पोलीस ठाणेचे तपास पथकातील सर्व अंमलदार यांचे उपस्थितीत मोबाईल देण्यात आले. नागरीकांना त्याच्या हरवलेला मोबाईल मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
सायबर पोलीस ठाणे सातारा कडील पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे, महेश शेटे, कर सावंत, सचिन पवार, संदिप पाटील, वर्षा खोचे, रेश्मा चव्हाण, यशोमती काकडे, ज्योती शिंदे, विण आहिरे, सुशांत कदम, महेश पवार, यशवंतराव घाडगे यांनी कामगिरीत सहभाग घेतला.