महाराष्ट्राला लवकरच मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून स्वयंपूर्ण करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला असताना ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न जात आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यातील साखर कारखान्यांना प्रकल्प उभारण्याचे आवाहन केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या प्रकल्पास आजपासून सुरवात केली आहे. या कारखाण्याने हा प्रकल्प सुरु केला असून आता इतरही कारखाने लवकरच अशा पद्धतीचा प्रकल्प सुरु करतील व अशा प्रकल्पातून महाराष्ट्राला लवकरच आपण ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण करू,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उदघाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कार्यक्रमास व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली होतो. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या कामाची माहिती घेतली. तसेच ऑक्सिजन निर्मिती करून आपण कोरोनाच्या या महाभयंकर विषाणू विरोधात पुकारलेले लढाही यातील पहिला टप्पा जिंकला असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यानी कोरोनाच्या या लढाईविरोधात कोणकोणत्या उपाययोजना हाती घेत त्या पूर्ण केल्या असल्याची माहिती दिली. शिवाय राज्यात सुरु केलेल्या कोविड
केअर सेंटर मधून अत्यंत चांगल्या स्वरूपातील उपचार देण्याचे काम सुरु असल्याचीही माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोरोनाच्या या लढाईत अतिशय खंबीरपणे उभे रहावे. तसेच ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी इतरही जास्तीत जास्त साखर कारखान्यांनी प्रयत्न केळवेत असे आवाहन केले.

Leave a Comment