आमदार बच्चू कडूंना न्यायालयाचा दणका, 17 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणी 20 हजारांचा ठोठावला दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – राज्यात आता शिंदे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे सरकारने काल विधानसभेत बहुमत सिद्ध करून पहिली लढाई जिंकली आहे. आता लवकरच शिंदे सरकाराच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गटामध्ये सामील झालेले प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (mla bachchu kadu) यांना मात्र कोर्टाने दणका दिला आहे. 17 वर्षांपूर्वी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्या प्रकरणामध्ये बच्चू कडूंना (mla bachchu kadu) 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (mla bachchu kadu) हे नेहमी या ना त्या आंदोलनामुळे कायम चर्चेत राहतात. राज्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू (mla bachchu kadu) यांच्या आंदोलनाची धार मात्र कमी झाली. 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख 5 ऑगस्ट 2005 रोजी अमरावतीच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली होती. ही बैठक सुरू असताना आमदार बच्चू कडू यांनी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन केले होतं. तापी नदी प्रकल्पासंदर्भात ‘मटकी फोटो’ आंदोलन करून बच्चू कडू (mla bachchu kadu) यांनी जोरदार निदर्शनं केली होी. त्यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती.

यावेळी बच्चू कडू (mla bachchu kadu) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी 4 जुलैला पार पडली. या प्रकरणी अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना वेगवेळ्या कलमान्वये 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.

हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!

Leave a Comment