महाराष्ट्रातील ६ आमदारांना १५ दिवसात द्यावा लागणार राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक काल लागलेल्या निकाला नंतर संपन्न झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेचे ६ आमदार खासदार झाले आहेत. त्या सहा खासदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राजीनामा १५ दिवसात सुपूर्द करणे बंधनकारक असल्याने त्यांना १५ दिवसातच आपला राजीनामा सादर करावा लागणार आहे.

पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

पुण्याचे खासदार गिरीष बापट , जळगावचे खासदार उन्मेष पाटील , हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिकलीकर, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील , चंद्रपूरचे खासदार बाळू धनुरकर या सहा नवनिर्वाचित खासदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय

पुण्यात गिरीष बापट यांनी मोहन जोशी यांचा पराभव केला. तर तिकडे जळगाव मध्ये भाजपच्या उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकारांचा पराभव केला आहे. हिंगोलीत कॉंग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा हेमंत पाटील यांनी पराभव केला. नांदेडमध्ये कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा प्रताप पाटील चिकलीकर यांनी पराभव केला. तर औरंगाबाद मतदारसंघात वंचितच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांची २० वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. तर तिकडे चंद्रपुरात केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज आहिर यांचा कॉंग्रेसच्या बाळू धनुरकर यांनी पराभव केला आहे.

Leave a Comment