शिवेंद्रराजे भोसले जर राष्ट्रवादीत आले तर नगरपालिका निवडणुकीचे ते नेतृत्व करतील- आ.शशिकांत शिंदे

सातारा । आगामी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपलं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सातारा नगरपालिकेची सत्ता मिळवळण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आमदार शशिकांत शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले जर राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिकेच्या निवडणुकीचे नैतृत्व करतील असं विधान शशिकांत शिंदे यांनी केल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. शशिकांत शिंदे यांनी आज जनता दरबार वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सदर वक्तव्य केलं आहे.

यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीचे नैतृत्व कोण करणार असा सवाल शशिकांत शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, ”राष्ट्रवादी पॅनेल टाकणार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे दिपक पवार आणि मी स्वत: या निवडणुकीचे नेतृत्व करणार आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील”, असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like