“Who is उदयनराजे ?” : आ. शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल
उदयनराजेंचा डोंबाऱ्याचा खेळ बघितला, हे छत्रपतींचे विचार का?
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कारखान्याला ऊस घालणाऱ्या सभासदांनी किंवा ऊस घालणाऱ्यांनी बोलावे. उदयनराजेंनी कधी शेती केलेली नाही त्यांनी कधी ऊस घातला नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी निवडणूक लागली की कारखान्यांवर आरोप पण कारखान्यांची निवडणूक बिनविरोध होते. अजिंक्यतारा कारखाना 10 व्या दिवशी एफआरपीचे पैसे देतो तो भ्रष्टाचार म्हणायचे का. वय वाढल्यामुळे त्यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे का असे म्हणतात, मला माहिती नाही. कारण मी त्यांच्या लेवला पोहचलो नाही. त्यांना अजूबाजूला बसणारे बगलबच्चे खोटी माहिती देतात काय हे त्यांनी तपासावे. बोलणारे तुम्ही कोण, कारखान्यांत भ्रष्टाचार झाला हे बोलणारे उदयनराजे कोण, कारखान्यातील सभासदांनी बोलावे. उदयनराजेंना नैतिक अधिकार नाही. Who is उदयनराजे असा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. छ. उदयनराजे यांनी केला आहे.
सातारा येथे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी अजिंक्यतारा सहकारी कारखान्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. तसेच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजे कोण असे म्हणत प्रतिप्रश्न केला आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने साताऱ्यात दोन्ही राजेंच्या पुन्हा वाकयुध्द सुरू आहे.
उदयनराजेंचा डोंबाऱ्याचा खेळ बघितला, हे छत्रपतींचे विचार का
मी छत्रपतीच्या विचाराचा आहे की नाही हे ठरवण्यचा अधिकार उदयनराजेंना कोणी दिला. थोर विचारवंत की इतिहासकार आहेत. छत्रपतीच्या विचाराचे तुम्ही आहात तर लोकसभेला का पडला आणि त्याचवेळी विधानसभेला मी निवडणुकीत निवडूण आलो, याचं उत्तर द्या. रात्रीच्या गाडी फिरवायच्या म्युझिक मोठ्यामोठ्याने सोडून गावातून फिरायचे. आपण यात्रेत डोबाऱ्यांचा खेळ बघतो, परवा उदयनराजेंचा डोबाऱ्यांचा खेळ बघितला हे छत्रपतीचे विचार आहेत का असा सवाल
उदयनराजेंचा भ्रष्टाचार केलेल्या कार्यकर्त्याला वाचविण्याचा अटापिटा
उदयनराजे ज्या कार्यक्रमाला गेले त्याच्याजवळ बसलेले गृहस्थ कडव यांच्यावर 40 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता यांच्यावर गुन्हा दाखल होवू नये, म्हणून उदयनराजे यांनी आटापिटा केलेला आहे.