स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका भाजप- शिंदे गट स्वतंत्र लढवणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसातच पार पडणार आहेत. या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. सरकार स्थापनेनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही शिंदे गट – भाजपकडून एकत्रित लढवलया जातील असे म्हंटले जात होते. मात्र, आता या निवडणूका भाजपसोबत न लढवण्याचा सूर शिंदे गटातील आमदारांकडून उमटत आहे. त्यामुळे भाजप – शिंदे गटाकडून स्वतंत्रपणे या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे बरोबरच भाजपही लढवणार आहे. त्याच्याप्रमाणे आता या निवडणुका लढवण्याचा निर्णय शिंदे गटानेही घेतला आहे.

आगामी निवडणुका या शिंदे कटाकडून स्वतंत्रपणे लढवणार असून निवडणुकीत अपक्ष उमेदवार उतरवण्याची तयारीही गटातील आमदारांनी केली आहे. शिंदे कटातील आमदारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपकडून आता काय भूमिका घेतली जाणार हे पहावे लागणार आहे.

Leave a Comment